बाह्यवर्ग प्रशिक्षण
पोलीस प्रशिक्षण केंद्रातील आउटडोअर प्रशिक्षणाचा उद्देश प्रशिक्षणार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक आणि व्यावहारिक कौशल्यांचा विकास करणे आहे. खालील उपक्रम आणि सुविधा केंद्रातील कवायत मैदानात व इतर खुल्या भागात नियमितपणे आयोजित केल्या जातात:
मुख्य उपक्रम :
कवायत मैदान
पी.टी., परेड, ड्रिल, औपचारिक समारंभ आणि कार्यक्रमांसाठी भव्य व सुव्यवस्थित मैदान.
पी टी परेड
परेड प्रशिक्षणाद्वारे प्रशिक्षणार्थींमध्ये शिस्त, संघभावना आणि आज्ञापालन विकसित केले जाते.
ऑबस्टॅकल
अडथळा प्रशिक्षणाद्वारे प्रशिक्षणार्थींमध्ये शारीरिक चपळता, धैर्य, संतुलन आणि वेग वाढवला जातो.
ड्रिल
पोलीस प्रशिक्षणाचे शिस्त, एकसंधता आणि वेळेची पावित्रा निर्माण करणारे महत्त्वाचे अंग आहे
शस्त्र कवायत
प्रशिक्षणार्थींना शिस्त, समन्वय, शस्त्र हाताळणी व आत्मविश्वास विकसित करण्याचे प्रशिक्षण दिले जाते.
कमांडो
प्रशिक्षणार्थींना धाडस, शारीरिक व मानसिक ताकद, जलद निर्णयक्षमता आणि युद्धकौशल्य विकसित करणे हा आहे.
जमाव विसर्जन कवायत
प्रशिक्षणार्थींना कायद्याच्या चौकटीत राहून सुव्यवस्था राखणे, जमावावर नियंत्रण मिळवणे व हिंसाचार रोखणे यासाठी तयार करणे हा आहे
