दिक्षांत संचलन
“गौरवाचा क्षण – प्रशिक्षणाचा शेवट, सेवाभावाची नवी सुरुवात”
नवप्रविष्ठ पोलीस शिपाई यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर दिक्षांत संचलन परेड आयोजित केली जाते. या परेडमध्ये –
-
प्रशिक्षणार्थी परेड कमांडरच्या आदेशावर धीरे चाल व तेज चाल करून अतिथींना मानवंदना देतात.
-
मुख्य मंचासमोरून संचलन करताना एकसंध, शिस्तबद्ध व ऊर्जावान मार्चिंगद्वारे त्यांचे प्रशिक्षणातील आत्मविश्वास व शिस्त प्रकट होते.
-
या परेडला मान्यवर अतिथी उपस्थित राहून सलामी स्विकारतात आणि प्रशिक्षणार्थींचा गौरव करतात.
-
हीच परेड प्रशिक्षणाची सांगता व पोलीस सेवेत प्रवेशाची औपचारिक सुरुवात ठरते.
अंतिम परेड
नवप्रविष्ठ पोलीस शिपाई यांचे दिक्षांत संचलन हा पोलीस प्रशिक्षण केंद्राचा सर्वात महत्त्वाचा आणि प्रतिष्ठेचा कार्यक्रम आहे. या परेडमध्ये प्रशिक्षणार्थी पोलीस शिपाई परेड कमांडरच्या आदेशानुसार धीरे चाल व तेज चाल करत मुख्य मंचासमोरून अतिथींना मानवंदना देतात.
निशाणटोळी
“शिस्त, सन्मान आणि परंपरेचे प्रतीक”
-
निशाणटोळी ही कोणत्याही परेड किंवा समारंभाची शान आणि आकर्षण असते.
-
राष्ट्रीय ध्वज, पोलीस विभागाचा ध्वज आणि परेडचे प्रतीकात्मक निशाण घेऊन ही टोळी परेडमध्ये सहभागी होते.
-
संचलनावेळी निशाणटोळी अग्रभागी राहते व सर्व प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन करते.
-
गौरव, परंपरा आणि देशभक्ती यांचे दर्शन घडवणारी निशाणटोळी प्रशिक्षणार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, शिस्त आणि देशसेवेची प्रेरणा जागवते.
शपथविधी
पोलीस सेवेत प्रवेश करताना प्रशिक्षणार्थींना कर्तव्यनिष्ठा, निष्ठा, सचोटी आणि गतिमानता याबाबत शपथ दिली जाते. हा समारंभ प्रशिक्षणाचा नैतिक पाया मजबूत करून जबाबदारीची जाणीव स्पष्ट करतो.
मुख्य मुद्दे
-
कर्तव्यनिष्ठा: जनतेची सेवा व कायद्याचे पालन प्रामाणिकपणे करण्याची प्रतिज्ञा.
-
निष्ठा: राष्ट्र, संविधान व पोलीस दलाप्रती अखंड निष्ठेची वचनबद्धता.
-
सचोटी: पारदर्शक, प्रामाणिक आणि निर्भीड वर्तनाची हमी.
बँड पथक
-
बँड पथकाच्या वादनामुळे परेडला भव्यता आणि औपचारिकता प्राप्त होते.
-
राष्ट्रगीत,राष्ट्रध्वज सलामी, मार्च पास या इव्हेंट वेळी बँड पथकाच्या वाद्याद्वारे सर्वत्र देशभक्तीची भावना व ऊर्जा निर्माण होते.
-
पोलीस दलाच्या परंपरेचा अभिमान दाखविणारे बँड पथक प्रशिक्षणार्थींसाठी प्रेरणादायी घटक ठरते.
कमांडो प्रात्यक्षिक
सत्र क. 20 मधील प्रशिक्षणार्थी यांनी दिक्षांत संचलनावेळी कमांडो प्रात्यक्षिक सादर केले होते. दहशतवादविरोधी कारवाई, बंधक सुटका, अडथळ्यांवर मात करणे, वेगवान आक्रमण तंत्र अशा कौशल्यांचा प्रात्यक्षिकातून परिचय करून दिला जातो.
हे प्रात्यक्षिक पाहून प्रशिक्षणार्थींमध्ये धैर्य, आत्मविश्वास आणि देशसेवेची प्रेरणा दृढ होते.
