पोलीस प्रशिक्षण केंद्र बाभळगाव, लातूर
पोलीस प्रशिक्षण केंद्र, बाभळगाव, लातूर ची स्थापना दि. 25 नोव्हेंबर 2005 रोजी होवुन दि. 23/11/2006 पासून हे प्रशिक्षण केंद्र प्रत्यक्षात कार्यन्वित झाले आहे. पोलीस प्रशिक्षण केंद्राचे एकुण क्षेत्र 16.17 हेक्टर आहेत.
आजपावेतो या प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणार्थी पोलीस शिपाई यांची एकूण 21 सत्र यशस्वीरित्या पुर्ण झालेली असून महाराष्ट्रामध्ये विविध जिल्हयात या प्रशिक्षण केंद्रातुन 11060 प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेवुन त्यांचे मुळ घटकामध्ये कार्यरत आहेत. मे 2025 मध्ये सत्र क्रमांक 21 चे 888 प्रशिक्षणार्थीचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पुर्ण झालेले असून सध्या ते मुळ घटकात कार्यरत आहे.
सध्या होमगार्ड सत्र क्रमांक 3 मधील 788 प्रशिक्षणार्थीचे प्रशिक्षण चालु आहे.
पोलीस प्रशिक्षण केंद्र, बाभळगाव (लातूर) — ताब्यातील हद्द व प्रमुख ठिकाणांचा नकाशा.
या नकाशामध्ये पोलीस प्रशिक्षण केंद्र, बाभळगाव (जि. लातूर) यांच्या ताब्यातील हद्दीची सीमा व हद्दीतील महत्त्वाची ठिकाणे दर्शविण्यात आली आहेत. प्रशिक्षण क्रियाकलाप, सुरक्षा व्यवस्थापन आणि यांत्रिक/प्रशासकीय समन्वयासाठी हद्दीतील प्रत्येक पॉईंट युनिक आयडीसह नोंदविण्यात आला आहे. नागरिक व प्रशिक्षणार्थी यांना परिसराची स्पष्ट माहिती मिळावी, हा उद्देश आहे.
